प्रेम कविता [ Marathi Prem Kavita]
Info Post
roses (Photo credit: Robert Couse-Baker)
रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..
...हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं .
ई-मेल फॉरवर्ड
0 comments:
Post a Comment