मी ऐकलंय .. [I came to know - marathi poem]
Info Post
मी ऐकलंय ..
की माझी पत्रे आणि ग्रींटींग जाळतांना
तुझा हात थरथरत होता म्हणून...
मी ऐकलंय
की तो तुला मंगळसूत्र बांधतांना
तुझा जीव तळमळत होता म्हणून...
मी ऐकलंय
की ऊखाणा घेण्यापुर्वी
तू
दिर्घ श्वास घेतलास म्हणून...
मी ऐकलंय
त्याने तुला स्पर्श करण्यापुर्वी
तू
डोळे गच्च मिटलेस म्हणून्...
मी ऐकलंय
की त्याला तू भारी
पसंत
पडलीस म्हणून...
मी ऐकलंय
की साखर पूडा होताच
तू रड रड रडलीस म्हणून...
मी
0 comments:
Post a Comment