अशी दे भाकरी [Marathi Poem]
Info Post
भ्रमंतीच्या नाक्यावरजरा गावांचे आडोसेअरे पोरा, नको बघूबरे आभाळ आभाळनाही रानाचा आधारनाही पायाखाली जोतेकाटक्यांच्या शिशिरातमाय चुलीशी खोकतेएका भाकरीत कसेभरे अर्धेच हे पोटत्याला तहान आसरावर पाणी घोट घोटनाही पसरलो कोठेनाही रुतलो मूळाशीओझ्या-गाठोड्यांच्या संगेगाढवांचे धनी झालोविठो, तुझ्या पायी आता मागे अखेरची भीक देरे, अशी दे भाकरी पुन्हा लागो नये भुक– अशोक नायगांवकर
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
0 comments:
Post a Comment