केवढे हे क्रौर्य!
Info Post
Image by law_keven via Flickrक्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
0 comments:
Post a Comment