मुक्ती ... [Freedom - Marathi Poem - Marathi Kavita]
Info Post
Image via Wikipediaमेलेल्या जनावरांना वेदना होत नसतातत्यांची स्पर्शजाणीव त्यांच्यासोबतच निघून जातेउरतात फक्त कुजत राहणारे देह ..आसमंतात भरणारा एक कुबट गंध ..आणि जमत राहणारे उपाशी गिधाडांचे टोळमग तो देह मेजवानी बनून जातो ..निसर्गाचे नियमच अवघड,एकाचा मृत्यु आणि दुसऱ्याची भुक, यांचेही किती सहज अर्थ जुळवले आहेतबरेच नियम मात्र अजुनही कळायचे आहेत ..मी अजुन वाट बघतो आहेकधीतरी कुणी एक तेजस्वी येईलच ..
0 comments:
Post a Comment