शेवटी समजून गेलो!
Info Post
Image via Wikipediaकाय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो!मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो!चारचौघांसारखे मज बोलणे जमलेच नाही,सांग तू आता शहाण्या, काय मी बरळून गेलो?मी अता घेणार नाही माप श्वासांच्या गजांचे...जन्मठेपेतून माझ्या आज मी निसटून गेलो!का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो?मी तुम्हासाठीच तेव्हा कोरडा बहरून गेलो!आज कैशी आपुली ही भेट ताटातूट झाली?भेटतांना ऐन वेळी मी कुठे हरवून गेलो?
0 comments:
Post a Comment