Breaking News
Loading...
Tuesday, 6 October 2009

Info Post
Image by pdeee454 via Flickrपोचुनी दारी तुझ्या मी परत जायचेमी असे आता कितीदा करत जायचे?रेखतो चित्रे अनोखी तो सभोवतीत्यांत केवळ रंग आपण भरत जायचे...किर्र काळोखात बुडल्या दशदिशा, तरीस्वप्न किरणांची उराशी धरत जायचे!(शुष्क पर्णासारखा गेलो गळून; पण -सांग कुठवर जीवनी मी तरत जायचे?)रोज मृत्यूच्या दिशेने वाटचाल; पणहसत-खेळत रोज थोडे मरत जायचेजीवनाने, अनुभवाने शिकवले, तरीगुरुजनांचे शिकवणेही स्मरत जायचे!

0 comments:

Post a Comment