नंगेपणा हा नेसला मी!
Info Post
Image by ManojVasanth via Flickrजन्म होता रुक्ष माझा; रुक्षतेने रेटला मी!मी न गुणगुणलो कधी की सूर नाही छेडला मी!मीच मांडामांड केली; मीच मोडामोड केली...खेळ होता एकट्याचा; एकट्याने खेळला मी!मी फिका पडणार नाही... मज न टवक्यांची क्षितीहीचेहऱ्याला रंग नाही कोणताही लेपला मी!मारते आकाश हाका... अन् धरित्रीही खुणावे...येथला की तेथला मी? तेथला की येथला मी?भोवती फेऱ्या तुझ्या मी मारल्या वर्षानुवर्षे...
0 comments:
Post a Comment