राहिले दूर, सख्या घर राहिले दूर !!
Info Post
Image by Andrea Costa Photography via Flickrराहिले दूर, सख्या घर राहिले दूर ।काळ हा रे लोटला, ठेवून आठवधूर ॥ ध्रु॥कोणत्या वाटे निघालो? नाकळे आता,संगती एकांत आणी विरहिणीचे सूर ॥१॥अस्पष्टसा अन तो उद्याचा चेहरा दिसतोकाळजाला बुडविती रे काळज्यांचे पूर ॥२॥शोधणे स्वतःस आता कठिणसे वाटे ,दाटली गर्दीच सारी भोवती रे क्रूर ॥३॥दोन घटका शांततेला सवडही नाही,पाठलागाने सुखाच्या, लाभते हुरहूर ॥४॥ई-मेल फॉरवर्ड -
0 comments:
Post a Comment